📘 अर्पण… विचारांच्या स्वातंत्र्याला!
पुस्तक लिहिताना लेखक शब्द लिहितो;
पण त्या शब्दांच्या मुळाशी अनेक पिढ्यांचे विचार उभे असतात.
“चार्वाक म्हणजे प्राचीन भारतातील महात्मा फुले होते.”
— डॉ. आ. ह. साळुंखे
दोन डॅडी आणि करोडपती एसआयपी हे पुस्तक मी सप्रेम अर्पण केले आहे—
लोकायत (चार्वाक) विचारपरंपरेतील सर्व विचारवंतांना आणि लोकायतांना.
ज्यांनी माणसाला प्रश्न विचारायला शिकवले…
तर्क आणि बुद्धीच्या कसोटीवर विचार तपासायला शिकवले…
स्वातंत्र्य, वास्तववाद, प्रयत्नशीलता आणि विज्ञानाभिमुख दृष्टिकोनाला महत्त्व दिले…
आर्थिक साक्षरतेची सुरुवातही मला याच ठिकाणी दिसते.
आपण पैसा का कमावतो?
तो कुठे खर्च करतो?
गुंतवणूक का करतो?
आपले आर्थिक निर्णय ज्ञानावर आधारित आहेत की गैरसमजांवर?
प्रश्न विचारणारा माणूसच अधिक सजग निर्णय घेऊ शकतो.
म्हणूनच दोन डॅडी आणि करोडपती एसआयपी हे फक्त SIP किंवा Mutual Fund समजावणारे पुस्तक नाही;
ते पैशाकडे विचारपूर्वक पाहण्याची दृष्टी विकसित करण्याचा एक प्रयत्न आहे.
ही अर्पणपत्रिका म्हणजे त्या विचारपरंपरेप्रती माझी कृतज्ञता. 🙏
तुमचा विचार, हीच आमची खरी ‘अर्थसमृद्धी’!
— रविंद्र तुकाराम कदम
अर्थसमृद्धी™
From Arth to Samruddhi™
#दोनडॅडीआणिकरोडपतीएसआयपी #अर्थसमृद्धी #RavindraTukaramKadam #FinancialLiteracy #लोकायत #चार्वाक #विचारस्वातंत्र्य #MutualFund #SIP
10,000+ वाचकांचा विश्वास
सोप्या भाषेत आर्थिक शिक्षण
भारतातील लोकप्रिय पुस्तके
0 comments