आजचा मोह की उद्याचे ध्येय ?

🌱 अर्थमित्र™ | मुलांची पैशांची शाळा

🌳 आजचा मोह की उद्याचे ध्येय? 🤔

चार्वाककडे ₹200 होते.

दुकानात त्याला एक छान खेळणं दिसलं. 🧸
किंमत — ₹200.

चार्वाक म्हणाला,
“सई, घेऊ का? माझ्याकडे बरोबर ₹200 आहेत!”

सईने विचारलं,
“तू नवीन Story Book घेण्यासाठी पैसे साठवत होतास ना?” 📚

चार्वाक थांबला.

खेळणं घेतलं तर आज मजा होईल.
पण मग पुस्तकासाठी साठवलेले ₹200 जातील.

आता प्रश्न असा आहे—

👉 खेळणं निवडलं, तर चार्वाक काय सोडतोय?

फक्त ₹200?

नाही!

तो पुस्तकाच्या ध्येयाकडे जाण्याची संधीही सोडतोय.

💡 यालाच Opportunity Cost म्हणतात.

आपण एका गोष्टीची निवड करतो, तेव्हा त्या पैशातून करता आली असती अशी दुसरी चांगली गोष्ट आपल्याला सोडावी लागू शकते.

म्हणून खर्च करण्यापूर्वी फक्त—

“हे मला हवं आहे का?”

एवढंच विचारू नका.

हा प्रश्नही विचारा—

🤔 “यावर पैसे खर्च केले, तर मला दुसरं काय सोडावं लागेल?”

🌳 आजचा अर्थमंत्र

प्रत्येक खर्चाची किंमत फक्त रुपयांत नसते;
कधी त्यासाठी दुसरी संधीही सोडावी लागते.

🎯 आजची Money Activity

तुम्हाला ₹300 मिळाले आहेत असे समजा.

🍕 Pizza — ₹300
📚 पुस्तक — ₹250
🐷 ध्येयासाठी बचत — ₹300

तुम्ही कोणता एक पर्याय निवडाल?

आणि सर्वात महत्त्वाचे—

तो निवडल्यामुळे तुम्हाला काय सोडावे लागेल?

आई-बाबांसोबत चर्चा करा. 👨👩👧

📲 अर्थमित्र™सोबत पैशांची शाळा रोज शिकूया!
नवीन गोष्टी, Quiz, Cartoons आणि Money Activities साठी WhatsApp Channel Follow करा 👇

https://whatsapp.com/channel/0029Vb8pKdHDuMRcfYo0o41c

🧠 तुमचा Financial Quotient (FQ) किती आहे?
मोफत FQ Test 👇

https://bms.nextlevel.in/bmsapp/fq/uXQuoLXTc0brzLHjzamrwHFn12j1f8BZTddjUlSPZpUlnaeY

#अर्थमित्र #मुलांचीपैशांचीशाळा #FinancialLiteracy #OpportunityCost #MoneySmartKids #MoneyDecisions #Arthsamruddhi #चार्वाकआणिसई

0 comments

Leave a comment