🌱 अर्थमित्र™ | मुलांची पैशांची शाळा
🎨 Money Cartoon
💰 चार्वाकला ₹50 मिळाले… आता काय? 🤔
आज चार्वाकला आजोबांनी ₹50 दिले. 💵
चार्वाक खुश झाला!
त्याच्या मनात लगेच विचार आला—
🍫 “चॉकलेट आणि आईस्क्रीम घेऊया! सगळे ₹50 खर्च करूया.”
पण तेवढ्यात त्याची नजर बचतपेटीकडे गेली. 🐷
चार्वाक थांबला.
“सगळे पैसे खर्च करू? की काही पैसे वाचवू?” 🤔
आता समजा, तुम्ही चार्वाकच्या जागी आहात.
तुम्ही काय कराल?
🅰️ सगळे ₹50 खर्च करेन.
🅱️ सगळे ₹50 बचत करेन.
🅲️ काही खर्च करेन + काही बचत करेन. ⭐
पण फक्त A, B किंवा C सांगायचे नाही!
💬 तुमचा निर्णय आणि त्यामागचे कारणही सांगा.
उदा.
“मी ₹20 खर्च करेन आणि ₹30 बचत करेन. कारण मला आज थोडा आनंदही घ्यायचा आहे आणि पुढच्या Goal साठी पैसेही ठेवायचे आहेत.”
💡 आजचा आर्थिक धडा
पैसे मिळाल्यावर ते लगेच खर्च करणे आवश्यक नाही.
थांबा → पर्याय पाहा → विचार करा → मग निर्णय घ्या.
कारण Financial Thinking म्हणजे फक्त पैसे वाचवणे नाही; आपण पैशाचा निर्णय का घेतोय, हे समजणेही आहे.
🌳 आजचा अर्थमंत्र
“पैसा खर्च करण्याआधी थांबा, विचार करा आणि मग निर्णय घ्या.”
🎯 आजची Activity — ₹50 Challenge
कागदावर लिहा—
💵 माझ्याकडे: ₹50
🛍️ खर्च: ₹___
🐷 बचत: ₹___
आता आई-बाबांना सांगा—
“मी पैसे असे का वाटले?”
📲 अर्थमित्र™सोबत पैशांची शाळा रोज शिकूया!
गोष्टी, Quiz, Cartoons आणि Money Activities साठी WhatsApp Channel Follow करा 👇
"🌱 अर्थमित्र | मुलांची पैशांची शाळा | Follow the 🌱 अर्थमित्र | मुलांची पैशांची शाळा | Arthsamruddhi™ channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Vb8pKdHDuMRcfYo0o41c
🧠 तुमचा Financial Quotient (FQ) किती आहे?
सुमारे 5 मिनिटांची मोफत FQ Test द्या 👇
https://bms.nextlevel.in/bmsapp/fq/uXQuoLXTc0brzLHjzamrwHFn12j1f8BZTddjUlSPZpUlnaeY
#अर्थमित्र #मुलांचीपैशांचीशाळा #चार्वाक #FinancialLiteracyForKids #MoneySmartKids #बचत #आर्थिकसाक्षरता #Arthsamruddhi
0 comments