रुपया रुपया जोडूया

🌱 अर्थमित्र™ | मुलांची पैशांची शाळा

🎵 रुपया रुपया जोडूया, ध्येयाकडे जाऊया! 🎯

रुपया रुपया जोडूया,
छोटे ध्येय ठरवूया.

आज थोडे पैसे वाचवू,
उद्याचे स्वप्न जवळ आणू.

पुस्तक असो वा नवा रंग,
सायकलची घंटी असो छान,
आधी ठरवू—हवे काय?
मग बचतीचा करूया Plan!

एकदम पैसे जमले नाही,
म्हणून काही हरकत नाही.

थोडे थोडे साठवत जाऊ,
ध्येयाकडे पुढे सरकू! 🌱

💡 आजचा आर्थिक धडा

बचत म्हणजे फक्त पैसे बाजूला ठेवणे नाही.

कशासाठी बचत करतोय हे माहीत असेल, तर ती Goal-based Saving.

समजा, सईला ₹300 चे पुस्तकांचे Set घ्यायचे आहे. 📚
तिने दर आठवड्याला ₹30 वाचवायचे ठरवले.

₹30 + ₹30 + ₹30...
अशी छोटी बचत तिला तिच्या ध्येयाजवळ घेऊन जाईल.

🎯 आजची Money Activity

तुमचे एक छोटे Money Goal लिहा:

माझे ध्येय: __________
त्याची किंमत: ₹__________
मी दर आठवड्याला वाचवेन: ₹__________
ध्येय पूर्ण होण्यासाठी अंदाजे: ______ आठवडे

🌳 अर्थमंत्र

“आधी ध्येय ठरवा, मग बचतीला दिशा द्या.”

📲 नवीन गोष्टी, Quiz, Cartoons आणि Money Activities साठी
🌱 अर्थमित्र™ WhatsApp Channel

🧠 पालकांनी आपली आर्थिक समज तपासण्यासाठी
Free Financial Quotient (FQ) Test

#अर्थमित्र #मुलांचीपैशांचीशाळा #GoalBasedSaving #बचत #MoneyGoal #FinancialLiteracy #KidsFinancialLiteracy #Arthsamruddhi

0 comments

Leave a comment